मुंबई-आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीचा फटका इंधनाला बसत आहे. आज पुन्हा मुंबईत पेट्रोलचा दर लिटरमागे ९१ रुपये २० पैसे तर डिझेलचा दर लिटरमागे ७९ रुपये ८९ पर्यंत पोहोचला.
दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८३ रुपये ८५ पैसे तर डिझेलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये २५ पैशांपर्यंत पोहोचला. तर मुंबईत पेट्रोलचा दर लिटरमागे ९१ रुपये २० पैसे आणि डिझेलचा दर ७९ रुपये ८९ पैसे इतका झाला. दिल्ली, चेन्नई व कोलकाता या तीन महानगरांपेक्षा मुंबईत पेट्रोल- डिझेलचे दर सर्वाधिक आहे. मुंबईत पेट्रोल व डिझेलवर सर्वाधिक मूल्यवर्धित कर असल्याने जास्त पैसे मोजावे लागतात.
एकट्या पुणे शहरामध्ये दररोज सुमारे ३५ लाख लिटर पेट्रोल, तर ५६ लाख लिटर डिझेलची विक्री होते. इंधनाच्या विक्रीमध्ये राज्यात मुंबईनंतर पुणे शहर आघाडीवर आहे. या शहरातील पेट्रोलच्या दराने लिटरमागे ९० रुपये ९७ पैशांवर झेप घेतली. तर डिझेलचे दर लिटरमागे ७८ रुपये ४४ पैशांपर्यंत पोहोचले आहे.
राज्यातील अन्य प्रमुख शहरांमधील दर
नागपूर
पेट्रोल ९१ रुपये ६८ पैसे
डिझेल ८० रुपये ४१ पैसे
औरंगाबाद
पेट्रोल ९१ रुपये ५९ पैसे
डिझेल ७९ रुपये ०५ पैसे
परभणी
पेट्रोल ९२ रुपये ९६ पैसे
डिझेल ८० रुपये ३६ पैसे