पाकिस्तानकडून भारताला पुन्हा एकदा चर्चेचे निमंत्रण

0

इस्लामाबाद-कर्तारपूर कॉरिडोर सुरु होण्याचा अर्थ म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल असे नाही असे सांगत काल परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानने दिलेले चर्चेचे निमंत्रण फेटाळले. दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताने पुन्हा एकदा चर्चेबाबत विचार करावे असे आवाहन केले आहे. कुरैशी यांनी पुन्हा एकदा भारताला चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. द्विपक्षीय चर्चा शक्य नसेल तर सार्क परिषदेच्या माध्यमातून चर्चा पुढे न्यावे असेही कुरैशी यांनी सांगितले आहे.

परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी द्विपक्षीय चर्चा आणि कर्तारपूर कॉरिडोर दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहे. भारत सरकार मागील २० वर्षापासून कॉरिडोरच्या बाबतीत पाकिस्तानशी चर्चा करत आहे असे सांगितले आहे.