एम.जे.अकबर यांच्यावर पुन्हा बलात्काराचा आरोप

0

नवी दिल्ली- #Me Too मोहिमेमुळे करण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले एम. जे. अकबर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या महिला पत्रकाराने एम. जे. अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. एशियन एज या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केल्याचा एका महिला पत्रकाराने केला आहे.

# Me Too मोहिमेत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली होती. यात एम. जे. अकबर यांच्यावरही आरोप झाले होते. जवळपास १० महिला पत्रकारांनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते.