नवी दिल्ली: केंद्रात पुन्हा एकदा मोदी कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. २०१४ साली मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देशातील जनतेशी सवांद साधण्यासाठी रेडीओ हे माध्यम निवडले होते. रेडीओच्या माध्यामातुन पंतप्रधान मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन कि बात’ करत होते. आता पुन्हा एकदा मोदी सरकार आल्यामुळे परत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन कि बात’ या कार्यक्रमातून देशातील जनतेला संबोधित करणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटरच्या अकाऊंट वरून या कार्यक्रमाची माहिती दिली होती. नंतर इन्स्टाग्रामवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली असून त्यात म्हटले आहे की, ३० जून रोजी सकाळी ११ वाजता आपण पुन्हा एकदा भेटूयात. रेडिओला धन्यवाद. १३० कोटी भारतीयांच्या भावना आणि सामूहिक सामर्थ्याची देवाण-घेवाण करूयात. मला विश्वास आहे की, आपणाकडेही खूप साऱ्या गोष्टी शेअर करण्यासाठी असतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी नमो अॅपवर आपल्या सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे.
या आपल्या दुसऱ्या टर्म मधील पहिल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी सूचना पाठवण्यासाठी १८००-११-७८०० या क्रमांकावर मेसेज रेकॉर्ड करण्यास सांगितले आहे . तसेच तुम्ही मला ओपन फोरमवर सुद्धा सूचना पाठवू शकता, असे म्हटले आहे. वेगवेगळ्या थीम आणि विचार शेअर करण्यास लोकांना आवाहन पंतप्रधानांनी आवाहन केले आहे, असे सूत्रांनी सांगितले. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम प्रसारित होणार आहे. मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील अखेरचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता.