मुंबई- काल एकदिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलच्या दरात आज मंगळवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल ११ पैसे तर डिझेल २४ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ८८.२९ रुपये लीटर तर डिझेल ७९.३५ पैसै लीटर झाले आहे. केंद्र व राज्य सरकारने मिळून ५ रुपयांनी कर कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर दररोज पेट्रोल आणि डीझेलच्या दरात वाढ होत आहे. दर कपातीचा कोणताही फायदा झालेला नसल्याचे दिसून येते. करुनही ग्राहकांना रोज इंधन दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. त्यात पेट्रोल दरात सोमवारी एक दिवसाचा दिलासा मिळाला होता. सोमवारी पेट्रोलच्या दरात कोणतेच बदल झाले नव्हते. मात्र डिझेलचे दर वाढले होते.
दिल्लीमध्येही पेट्रोलच्या दरात ११ पैशांनी तर डिझेलमध्ये २३ पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल ८२.८३ आणि डिझेल ७५.६९ पैसे प्रति लीटर असे दर आहेत. दरम्यान, इंधन दरवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. यावेळी मोदींनी या कंपनींच्या प्रतिनिधींशी दरवाढीबाबत चर्चा केली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ झाल्याचे दिसून येते.