आज पुन्हा पेट्रोल-डीझेल स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

0

मुंबई- गगणाला भिडलेल्या इंधन दरवाढीमुळे सामान्य त्रस्त होते. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज होणाऱ्या वाढीमुळे सामन्यांच्या खिशाला चटका सहन करावा लागत होता मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात इंधन दरात कपात होताना दिसत आहे. आज रविवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात १६ पैशांनी तर डिझेलच्या दरात १३ पैशांची कपात झाली आहे. या दरकपातीमुळे जनतेला थोडासा दिलासा मिळत आहे. मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटर ८३.२४ तर डिझेल ७५.९३ पैसे प्रति लिटर दराने मिळेल.

दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात १६ पैशांची तर डिझेलच्या दरात १२ पैशांची घट झाली आहे. तिथे पेट्रोल ७७.२३ रुपये तर डिझेल ७२.४६ रुपये प्रति लिटर दर आहे.