कोलंबो- श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान महिंद्र राजपक्षे यांची पंतप्रधानपदी करण्यात आलेली निवड बेकायदा असल्याचे ठरविल्याने राजपक्षे यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी काल रणिल विक्रमसिंगे हे पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे. अध्यक्ष मैथिरीपाल सिरीसेना यांनी त्यांची निवड केली.
विक्रमसिंगे यांच्या शपथविधीने आता ५१ दिवसांचा घटनात्मक पेच संपुष्टात आला आहे. विक्रमसिंगे हे युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते असून त्यांना अध्यक्ष सिरीसेना यांनी अधिकारपदाची शपथ दिली. २६ ऑक्टोंबर रोजी सिरीसेना यांनीच रणिल विक्रमसिंगे पदावरून काढून त्यांच्या जागी महिंदा राजपक्षे यांची नेमणूक केली होती.
विक्रमसिंगे यांनी आजचा दिवस केवळ माझ्यासाठी नव्हे तर युनायडेट नॅशनल पार्टीसाठी ऐतिहासिक आहे. श्रीलंकेच्या लोकशाही संस्था व नागरिकांचे सार्वभौमत्व यांचा यात विजय झाला आहे. जे कुणी राज्यघटनेच्या समर्थनार्थ धावून आले त्यांचा मी आभारी आहे. हा लोकशाहीचा विजय असल्याचे जगासमोर आले आहे असे सांगतिले.