आता एका दिवसात मिळणार आयकर परतावा !

0

नवी दिल्ली- आयकर रिटर्न भरल्यानंतर सरकारकडून टॅक्स रिफंडसाठी ६३ दिवस वाट पाहावे लागत होते. मात्र आता केवळ एका दिवसात प्राप्तिकर परतावा मिळणार आहे. प्राप्तिकर विवरणपत्राची छाननी अवघ्या एक दिवसात करणाऱ्या एकात्मिक ‘ई-फायलिंग’ आणि केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्राप्तिकर विवरणपत्रांची छाननी करण्याची प्रक्रिया केवळ एका दिवसात होईल. ही नवी सुविधा सुरु करण्यासाठी १८ महिने लागणार आहेत, त्यानंतर आणखी तीन महिन्यांच्या चाचणीनंतर ते सुरू होईल.

जवळपास ४ हजार २४१ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या एकात्मिक ‘ई-फायलिंग’आणि केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राच्या निर्मितीची जबाबदारी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंफोसिसकडे देण्यात आली आहे.