पोलिसांच्या खबरीवरून एकाची हत्या

0

गडचिरोली : गडचिरोलीत माओवाद्यांनी एकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पांडुरंग पदा असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन माओवाद्यांनी पांडुरंग पदा यांची हत्या केली आहे. पांडुरंग पदा हे धानोरा तालुक्यातील होरेकसा इथले रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.