VIDEO…एका तरुणीकडून आमदार कदमांना ओपन चॅलेंज !

0

पुणे-भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन असे बेताल वक्तव्य राम कदम यांनी केले. या वक्तव्यावरून राम कदम यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे.

दरम्यान आमदार कदम यांच्या या व्यक्तव्यावरून मराठा तरूणीने ओपन चॅलेंज दिले आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला असून थेट आमदार कदमांना चॅलेंज केले आहे.

”राम कदम तुम्हाला मी चॅलेंज करते, मला तुम्ही मुंबईला बोलवा किंवा मी मी मुंबईत येते. आल्यानंतर मला फक्त बोटाने स्पर्श करून दाखवा, उचलून न्यायची गोष्ट तर लांबच राहिली. त्याबद्दल मी नंतर बघते. तुम्ही जे वक्तव्य ते अत्यंत लांछनास्पद आहे. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे इथे स्त्रियांचा आदर केला जातो. स्त्रीला देव्हाऱ्यातली देवी समजतात. त्यामुळे तुमच्या या घाणेरड्या वक्तव्यांची महाराष्ट्रात जागा नाही. तुम्ही जे बोलला आहात त्याबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची आहे आपण आमनेसामने भेटून बोलू. तुम्हाला मी फोन केला होता पण तुम्ही उचलला नाही. आता तुमच्या फोनची मी वाट बघते आहे. तुम्ही फोन करा आणि माझे चॅलेंज स्वीकारा अशीच माझी अपेक्षा आहे.” अशा शब्दात या मुलीने आपला निषेध नोंदवत राम कदम यांना खुले आव्हान दिले आहे.