चोपडा प्रतिंधी l महाविद्यालयात उपप्राचार्य हळपे यांचा सत्कार चोपडा : माणुसकीचा गहिवर व समर्पित भावनेने काम करून कर्म हीच पूजा मानणारी व्यक्तीच विद्यार्थीप्रिय शिक्षक बनू शकते. उपप्राचार्य हळपे यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात टिकण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले म्हणून भारतीय जैन संघटनेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ते पात्र ठरले असे प्रतिपादन संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड सदीप सुरेश पाटील यांनी केले. येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद्यालयात उपप्राचार्य प्रा.बी. एस. हळपे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा आशा विजय पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. उपप्राचार्य प्रा बी एस हळपे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सपत्नीक सत्कार संस्थेचे अध्यक्ष अँड संदीप सुरेश पाटील व सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य डॉ. डी .ए . सूर्यवंशी यांनी प्रा.हळपे यांच्या शैक्षणिक कामाचे कौतुक केले. मनोगत व्यक्त करतांना उपप्राचार्य हळपे यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील यांनी जुलै1990 पासून सेवेची संधी दिल्याबद्दल व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ॲड संदीप पाटील व सचिव डॉ स्मिता पाटील यांनी उपप्राचार्य म्हणून सेवेची संधी दिल्याबद्दल त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की इंग्रजी विषय सोपा करून शिकवल्याने कला , वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य विभागाच्या असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली व वेगवेगळ्या क्षेत्रात ते नोकरी करीत आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थी घडवता घडवता स्वतःची दोघं मुले डॉक्टर्स बनवता आली. प्राचार्य डॉ. डी ए सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा डॉ. ए .एल चौधरी, प्रा संदीप बी पाटील सौ.माधुरी हळपे शिक्षिका, विवेकानंद विद्यालय व डॉ. गौरव हळपे रेडिओलॉजिस्ट यांनी मनोगते व्यक्त केली. पर्यवेक्षक प्रा एस पी पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा दिपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.पी एस पाडवी यांनी आभार मानले. समन्वयक प्रा डॉ.शैलेश वाघ , समन्वयक प्रा ए एन बोरसे , प्रा डॉ पी एस लोहार, प्रा डॉ. बी एम सपकाळ, श्रीमती सुशीला लासुरे, सौ.स्वाती सपकाळ, हिमांशू हळपे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भरत भालेराव, राकेश काविरे व धिरज बाविस्कर यांनी सहकार्य केले.