जळगाव- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इव्हीएम मशिनमध्ये घोळ झाला असून त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जो पराभव झाला तो आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आगामी निवडणुक या ईव्हीएम मशीनवर न घेता, पूर्वीप्रमाणेच बलेट पेपरवर घेण्यात याव्यात अन्यथा निवडणुकीत उमेदवार देणार नाही, असा ठराव शुक्रवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत घेण्यात आला.
शहरातील जिल्हा कार्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे अनेक नेते व पदाधिकारी अनुपस्थित होते. तसेच कायकर्ते देखील अपेक्षेप्रमाणे आले नव्हते. त्यामुळे तासाभरात तालुकाध्यक्षांचा भावना व जिल्हाध्यक्षांचे मागदर्शनाची औपचारीकता आटोपून बैठक गुंडाळण्यात आली. उद्या शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याच्या उपस्थित मुबंईत बैठक असल्याने तसेच उन्हामुळे अनेक नेते व पदाधिकारी आले नसल्याचे सागंत उपस्थित पदाधिकार्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.