उज्जैन- येथील महाकाळ मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने एक महत्व पूर्ण निकाल दिला आहे. यापुढे आता शिवलिंगावर केवळ शुद्ध आरओचे पाणी टाकण्यात यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. शिवलिंगात होणारी घसरण लक्षात घेता हा निर्णय देण्यात आला आहे. दरम्यान या ठिकाणी पूजेच्या पद्धतीबाबत कोर्टाचे आदेश असल्याचे फलक लावण्यात आलेले होते ते हटविण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहे. शिवलिंग मंदिरात पूजा-अर्चा कशी करावी हे ठरविणे आमचे काम नाही. आम्ही केवळ शिवलिंग सुरक्षित ठेवण्याबाबत सांगू शकतो असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.