मुंबई: पंतप्रधान मोदी यांना २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जे अद्भुतयश मिळाले आहे. या मिळालेल्या विजयावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दै. सामना मधून विरोधी पक्षांवर टीका केली असून आता विरोधी पक्षांनी आत्मचिंतनासाठी हिमालयात जायला हवे असा टोला त्यांनी लगावला आहे. या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला देशात ३५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. देशात मतदानाचा शेवटचा टप्पा झाला त्यावेळी मोदी हे दोन दिवसीय केदारनाथ, बद्रीनाथ दौऱ्यावर गेले होते. तेव्हा देशातल्या विरोधी पक्षांनी मोदि यांची खिल्ली उडवली होती त्याचे उत्तर आज उद्धव यांनी आपल्या लेखात केले आहे.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आता आत्मचिंतन केलें पाहिजे. तसेच विरोधकांनी आता अंगावर राख लावून हिमालयात जाण्याची वेळ आली आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. प्रचंड बहुमतांनी मोदी हे पुन्हा पंतप्रधान होत आहे, आणि हीच आज राष्ट्राची गरज होती. असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.
सत्तेवर येण्यासाठी ज्या प्रामाणात उलथापालथी होतात तसे काही न होता लोकशाही मार्गाने मोदी यांनी विजय मिळवला आह. मोदींनी आपल्या विजयाचे श्रेय देशाच्या जनतेला दिले आहे. हीच नम्रता विजयानंतर मोदी यांच्यात दिसते असे त्यांनी आपल्या लिखाणातून मोदींवर स्तुतिसुमने उधळली आहे,.