भुसावळ- ऑर्डनन्स फॅक्टरीत कामगार म्हणून असलेल्या विश्वास पंडित तायडे (40, रा.अमरनाथ नगर, भुसावळ) यांनी बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याबाबत त्यांचे भाऊ मोहन पंडित तायडे यांनी बाजारपेठ पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत तायडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा जय व कुणाल तसेच दोन भाऊ असा परीवार आहे.