हिरे व्यापारी निरव मोदीला सात हजार कोटी परत करण्याचे आदेश

0

पुणे: पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून पळालेला हिरे व्यापारी निरव मोदीला पुण्याच्या कर्ज वसुली न्यायाधिकरणाने मोठा झटका दिला असून, पीएनबी बँकेला ७ हजार ३०० कोटी रुपये परत करण्याचे आदेश दिले आहे. पुण्यात निरव मोदी विरोधात दोन खटले सुरु असून, त्यात हा पहिला निकाल देण्यात आला आहे. निर्व मोदी व त्याच्या कुटुंबाने पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून १३ हजार कोटीचा गैरव्यवहार केला होता. त्यानंतर निरव हा देशाबाहेर पळून गेला आहे.

 पीएनबी बँकेने कर्जवसुलीसाठी 'डीआरटी'कडे धाव घेतली. मात्र, मुंबईतील 'डीआरटी'मध्ये न्यायाधीशांचे पद रिक्त असल्याने हा दावा पुण्यातील 'डीआरटी'कडे (डीआरटी वन) वर्ग करण्यात आला. बँकेने सात हजार कोटी रुपयांचा एक, तीनशे कोटी रुपयांचा एक आणि १७०० कोटी रुपयांचा एक असे तीन दावे दाखल केले आहेत. त्यापैकी दोन दाव्यांचा निकाल आज देण्यात आला असून कोर्टाने मोदीला हे आदेश दिले आहेत.