आयुध निर्माणीत भरतनाट्यम कार्यशाळेचे आयोजन

भुसावळ प्रतिनिधी । येथील केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणीत भरतनाट्यम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रूट्स २ रूट्स अंतर्गत हो कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या मुख्य कलाकार कु तन्वी कदमजी (मुंबई) यांनी केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भुसावळच्या विद्यार्थ्यांना भरतनाट्यम अंतर्गत हाताची मुद्रा, त्याची शैली, चेहन्यावरील हावभाव, रचना आणि भरतनाट्यमसाठी आपण दररोज कोणत्या गोष्टींचा सराव केला पाहिजे, याविषयी समजावून सांगितले. संपूर्ण शाळेत आनंदाचे आणि संगीतमय वातावरण होते. रूट्स २ रूट्स ही एक एनजीओ आहे. जी केवळ ऑनलाइनद्वारे मुलांसाठी संस्कृतीशी संबंधित अतिशय महत्त्वाचे डिजिटल शिक्षण वर्ग आयोजित करत नाही तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय नृत्य, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत इत्यादी ऑफलाइन सांस्कृतिक कार्यशाळा आणि सुगम संगीत कार्यक्रमांच्या कार्यशाळा आयोजित करते. केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी, भुसावळचे प्राचार्य माननीय नितीनकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरतनाट्यम कार्यशाळा यशस्वी झाली. प्रभारी प्राचार्या रंजना विगम यांच्या देखरेखीखाली संपन्न झाले. सांस्कृतिक व संगीत विभागाच्या प्रभारी श्रीमती रजनी पवार (संगीत शिक्षिका) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.