पिंपरी चिंचवड इन्क्युबेशन सेंटर येथे “फेस्टिव्हल ऑफ स्टार्टअप २०२३” कार्यक्रमाचे आयोजन
नव्या उभरत्या स्टार्टअप, गुंतवणुकदारांनी सहभागी होण्याचे आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराच्या परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्टार्ट अप युनिटची सुरुवात करण्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शन देणे, स्टार्ट अपला सहाय्य करणे या मुख्य उद्देशाने पिंपरी चिंचवड इन्क्यूबेशन सेंटर सूरू करण्यात आले आहे. नव्या उभरत्या स्टार्टअप्सला गुंतवणूकदार, तज्ञ मार्गदर्शक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टीने चिंचवड येथील पिंपरी चिंचवड इनक्युबेशन सेंटर, ऑटो क्लस्टर सभागृह येथे बुधवार, दि. ६ व ७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता “फेस्टिव्हल ऑफ स्टार्टअप २०२३” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, तज्ञ मार्गदर्शक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
“फेस्टिव्हल ऑफ स्टार्टअप २०२३” या कार्यक्रमामध्ये स्टार्टअप्सकरिता मार्गदर्शन, चर्चासत्रे, स्टार्ट अप्स संदर्भात प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम (आश्रय), शार्क टँक इव्हेंट (उद्योजक समर्थ दिशा) असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्टार्टअप्स प्रकल्पांच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच, स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात मदत होणार आहे.
दि. ६ ते ७ सप्टेंबर रोजी होणा-या दोन दिवसीय कार्यक्रमाची सूरूवात सकाळी ९ वा. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने होईल. परमानंदन बालसुब्रमण्यम, (कुलपती- श्री बालाजी विद्यापीठ, पुणे) हे स्टार्टअपला मार्गदर्शन करतील. अमोल नितावे ( “इव्हॉल्व्हिंग एक्स प्रोग्रामद्वारे उद्योजकता वृत्तीला प्रोत्साहन द्या”), दिपक विश्वकर्मा (“उद्योजकांसाठी विक्री आणि विपणन थेट कार्यशाळा”), कपिल बैरागी – सहाय्यक महाव्यवस्थापक (HOABL) सीए (“स्टार्टअप इव्हॅल्युएशन, एमव्हीपी विश्लेषण आणि व्यवसायातील फंड क्रायसिस मॅनेजमेंट), “शहराच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधांची आवश्यकता” या विषयावर पॅनल चर्चा, भरत ओसवाल (“तुमचा मार्ग आजमावत आहे – स्टार्टअप वाढीसाठी टिपा आणि युक्त्या”), मीरा मणेरीकर (“स्टार्टअप ह्युमन रिसोर्स स्ट्रॅटेजी”) तसेच “चॅलेंजिंग टाइम्समध्ये नवीनता स्वीकारणे” याविषयावर पॅनेल चर्चा, रवी कुमार – (udchalo.com), नवनाथ येवले (येवले चाय) – तळागाळातील कथा, पुरस्कार सोहळा. तसेच दि. ७ रोजी महेश कुलकर्णी माजी सीएफओ, एंजल इन्व्हेस्टर, स्टार्टअप मेंटॉर), मनोज मिश्रा (संचालक – फिनान्झा होल्डिंग पीटीई लिमिटेड, सिंगापूर) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमाबाबत बोलताना आयुक्त शेखर सिंग म्हणाले की, “नवीन व्यवसायांमधील अंतर भरून काढण्यासाठी नव उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध आमचा भर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात अनुकूल स्टार्टअप इको-हब तयार करून त्यांना योग्य मार्गदर्शक आणि गुंतवणूकदारांसोबत संरेखित करण्याबाबतचे उद्दिष्टये ठेवण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडच्या आगामी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्टार्टअप योजना राबविली जात आहे.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड मार्फत शहरातील नवउद्योजकांच्या मार्गदर्शनासाठी दि. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर यांचे संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड इन्क्यूबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. इंन्क्यूबेशन सेंटर अंतर्गत सध्या ५० स्टार्टअप कार्यरत आहेत. तसेच, १८ विविध क्षेत्रातील मार्गदर्शकांची टीम देखील कार्यरत आहे. या व्यतिरिक्त विविध उपक्रमांच्या अंतर्गत अभियांत्रिकी विषयाशी संबंधित प्रशिक्षण, सेमिनार्स, कार्यशाळा, बाजारपेठेमध्ये उत्पादनाचे विपणन (मार्केटिंग) या विविध विषयांसंदर्भात या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. यासाठी वेळोवेळी उद्योग, तंत्रज्ञानाशी संबंधित कार्यशाळा, उद्योजक आणि तज्ञांची व्याख्याने अशा अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. स्टार्टअप महोत्सवासाठी स्टार इंजिनियर्स, बँक ऑफ बडोदा, श्री बालाजी विद्यापीठ पुणे, शिर्के कन्स्ट्रक्शन्स, एल & टी आणि ब्रदर्स इन्स्टिट्यूट यांनी इनक्युबेशन पार्टनर म्हणून प्रायोजित केला आहे.
“फेस्टिव्हल ऑफ स्टार्टअप २०२३” या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल अॅपच्या माध्यमातून नोंदणी करता येईल. नोंदणी करण्यासाठी https://pcsic.org/events/festivalofstartup-2023/ लिंकवर क्लिक करावे किंवा क्यूआर कोड स्कॅन करावा. तसेच जास्तीत जास्त स्टार्टअप्सनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.