सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथील हरीभक्त भाविकांचे व स्वामीनारायण संप्रदायाचे खान्देशातील महत्वाचे धार्मिकस्थळ असलेल्या सावदा येथील स्वामीनारायण मंदीरातील राधाकृष्ण देव, हरीकृष्ण महाराज यांचा 109 वा वर्धापनदिन सोहळा दि 30 रोजी वडताल द्विशताब्दी महोत्सव व भगवान स्वामीनारायण यांची पुण्यतिथी या निमित्ताने होत आहे
या कार्यक्रमा साठी दि 29 रोजी सायंकाळी येथील विठ्ठल मंदिर गांधी चौकातून स्वामीनारायण मंदीरा पर्यंत जलयात्रा निघणार असून याच जलाने दि 30 रोजी भगवान यांचा अभिषेक करण्यात येणार आहे
दि 30 रोजी सकाळी 6 ते 7 पूजन, 7 ते 8 देवांचा अभिषेक, 9 ते 10:30 सत्संग सभा होणार असून यात उपस्थित संतगण प्रवचन सत्संग करणार आहे सदर सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक स्वामीनारायण मंदिर सावदा कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी, समस्त विश्वस्त मंडळ, व समस्त सत्संग समाज, महिला मंडळ, यवा मंडळ यांनी केले आहे