शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन व संभाव्य दुष्काळी परिस्थितीशी लढा देण्यासाठी जल – जंगल संवर्धन अभियानाचा शुभारंभ
शहादा,ता.२९ : येथील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ७३ व्या स्थापना दिनानिमित्त (ता.२ )सप्टेंबरला शनिवारी दुपारी पावणे तीन वाजता शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन व संभाव्य दुष्काळी परिस्थितीशी लढा देण्यासाठी जल – जंगल संवर्धन अभियानाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी असतील तर जल जंगल संवर्धन अभियानाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष वनश्री मोतीलाल पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, आमदार शिरीष नाईक, आमदार कुणाल पाटील, आमदार राजेश पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित ,तळोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सीमा वळवी, रजनी नाईक,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जामसिंग पराडके आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शेतकरी मेळाव्याला शेतकऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, उपसभापती डॉ. सुरेश नाईक व संचालक मंडळाने केले आहे.
“दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत चालले आहे . त्याच्या परिणाम शेती उत्पादनासोबतच पाणीटंचाई आदी समस्या उद्भवू शकतात. भविष्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीशी लढा देण्यासाठी जल जंगल संवर्धन अभियान राबवायचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ७३ व्या स्थापना दिनानिमित्त भव्य शेतकरी मेळावा व जल जंगल संवर्धन अभियान राबवायचे संचालक मंडळाने ठरवले आहे. यासाठी अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे.”— अभिजीत पाटील (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा)