भुसावळ प्रतिनिधी l
देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले असून, या निमत्ताने देशभरात भाजपा मार्फत मोदी @ 9 “महाजनसंपर्क अभियान” सुरू आहे. या अनुषंगाने आज भाजपा भुसावळ तर्फे “विकास तीर्थ” कार्यक्रमाचे रावेर लोकसभा क्षेत्रातील नवनिर्मित चिखली-तरसोद राष्ट्रीय महामार्ग, जळगांव रोड भुसावळ बायपास येथे माजी कृषी मंत्री कर्नाटक अरविंद लिंबावली, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व आ. श्री.संजयजी सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले.
यावेळी माजी कृषी मंत्री कर्नाटक अरविंद लिंबावली, खासदार रक्षाताई खडसे व आमदार . संजयजी सावकारे यांनी उपस्थित संबोधून मोदी सरकार मार्फत करण्यात आलेल्या विकास कामांचा लेखजोखा मांडून, रावेर लोकसभा क्षेत्रात जवळजवळ ९०० कोटी खर्च करून बनविण्यात आलेल्या चिखली-तरसोद राष्ट्रीय महामार्ग बद्दल माहिती देऊन, परिसरातील नागरिकांना यांचा काय फायदा झाला याबाबत माहिती दिली व मोदी सरकारच्या ह्या विकास तीर्थाबाबत वैयक्तिक अनुभव जाणून घेण्यात आले.
यावेळी माजी कृषी मंत्री कर्नाटक अरविंद लिंबावली, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांच्यासह नामदेव ढाके, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी नगरसेवक मनोज बियाणी, शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, समिती सभापती, अनिल वारके, माजी नगराध्यक्ष . युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, राजेंद्र नाटकर, .शैलेजा पाटील, सुनिल पाटील, गणेश धनगर, तालुका सरचिटणीस . रमाशंकर दुबे, . संदीप सुरवाडे, श्री. दिनेश राठी, अॅड. प्रकाशराव पाटील, . किरण महाजन, . प्रमोद सावकारे, . गोलू पाटील, . सदानंद उन्हाळे, . प्रशांत पाटील, . चंद्रशेखर अत्तरदे, . समाधान महाजन, अॅड. महेशचंद्र तिवारी, . नरेंद्र पाटील, . राहुल तायडे, सौ. अनिता आंबेकर, . मनिषा पाटील, . अलका शेळके, अॅड. अभिजित मेगे, . किरण चोपडे सागर चौधरी, . श्रेयेश इंगळे ई. उपस्थित होते.