लादेनचा ठावठिकाणा सांगणारा भोगतोय तुरंगवास

0

वॉशिंग्टन – अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा उघड करणाऱ्या डॉ. शकील आफ्रिदी यांची तुरूंगातून सुटका करण्याची मागणी वकिलांच्या संघाने केली आहे. अमेरिकास्थित व्हॉईस ऑफ कराची या ग्रुपने आफ्रिदी यांच्याविषयी विशेष आस्था दाखवत त्यांना सोडविण्याची मागणी केली आहे. आफ्रिदी यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. २०१३ साली पाकिस्तानच्या न्यायालयाने त्यांची सर्वच आरोपांतून मुक्तता केली होती. मात्र, अद्यापही ते तुरुंगात आहेत. त्यांना पेशावर तुरुंगातून अज्ञात ठिकाणी हलविण्यात आले आहे. यासंबंधी ‘व्हॉईस ऑफ कराची’चे प्रमुख नदीम नुसरत म्हणाले, की पाकिस्तानातील असंख्य धर्मनिरपेक्ष नागरिक आणि आमची संघटना डॉ. शकील आफ्रिदी यांच्या सुटकेची मागणी करीत आहे.