आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी इतिहासाचे संचित आपली बोली भाषा असते “. असे प्रतिपादन साहित्यिक आणि वक्ते प्रा. व. पु. होले यांनी केले.
“बोली भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम असून भाव आणि संवेदनाचे उत्तम प्रतिक आहे. व्यक्तीला ज्या सहज पणाने बोलीभाषेतून व्यक्त येता येते ते इतर भाषेतून शक्य होत नाही. आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी इतिहासाचे संचित आपली बोली भाषा असते “. असे प्रतिपादन साहित्यिक आणि वक्ते प्रा. व. पु. होले यांनी केले.
ते भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयात ” कवयित्री बहिणाबाई चौधरी लेवा बोली भाषा अभ्यास व संवर्धन केंद्राच्या ” उदघाट्न समारंभात उदघाटक म्हणून बोलत होते. सभारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे होते.
आपले उदघाटीय मनोगत व्यक्त करतांना प्रा. होले पुढे म्हणालेत की , “लेवा बोली ही जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागातील एक महत्वाची बोलली जाणारी बोली आहे. शेतीत राबणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, खेडुत अशा साध्या सरळ समुदायाची हो बोली आहे. जिचे :उच्चार अगदी सहज आणि अर्थपूर्ण असतात. कवयित्री बहिणाबाई, के. नारखेडे,ज्ञानपीठकार भालचंद्र नेमाडे आदींनी तिला प्रथम मराठी साहित्य क्षेत्रात आणल्याने खऱ्या अर्थाने मराठी मनाला या बोलीचा परिचय झाला. त्या नंतर अनेक अभ्यासक, साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेच्या अक्षरानीं समवृद्ध केले. मानवी जीवनाच्या इतिहासाचे अध्ययन करतांना बोलिंचा अभ्यास व संवर्धन होणे महत्वाचे आहे. ”
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य कोल्हे यांनी बोलीच्या अभ्यासाचे महत्व व या केंद्रामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास एस. के. महाजन सर (खिर्डी ), प्रशांत धांडे सर, माजी प्राचार्य डॉ. अजय कोल्हे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभागाचे प्रमुख तथा केंद्राचे संचालक प्रा. डॉ. जतिन मेढे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ दिनेश पाटील तर आभार प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी – प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.