लखनऊ : शिवसेना हा भाजपचा जुना मित्र असून २०१९ ची लोकसभा निवडणूक शिवसेनेला सोबत घेऊन लाढायची आहे, मात्र शिवसेनेची एनडीएत राहण्याची तयारी नसेल तर तो निर्णय त्यांनी घ्यावा भाजप कुठल्याही परिस्थितीला सामोर जाण्यास तयार असल्याचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लखनऊत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेनेने दूर जावू नये असाच आमचा प्रयत्न आहे. मात्र त्यांची तयारी नसेल तर निर्णय शिवनेने घ्यावा असेही ते म्हणत त्यांनी बॉल शिवसेनेच्या कोर्टात टाकला. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आला तर भाजपसमोर ते मोठे आव्हान असेल अशी कबूलीही त्यांनी दिली. २०१४ मध्येही अनेक पक्ष भाजपविरूध्द लढले होते मात्र विजय भाजपनेच मिळवला असेही त्यांनी स्पष्ट केले . आंध्रप्रदेश, ओडिसा, केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्ये भाजप जास्त जागा मिळवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.