१२२ पैकी केवळ ३ आयपीएस ‘ट्रेनिंग’मध्ये पास

0

हैदराबाद – सरदार वल्लभभाई नॅशनल पोलीस अॅकडमीतील बहुतांश प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी प्रशिक्षणकाळातील परिक्षेत अनुत्तीर्ण ठरले आहेत. १२२ पैकी केवळ तीन अधिकारी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले असून ११९ अधिकारी अनुत्तीर्ण ठरले आहेत. परीक्षा पास होण्यासाठी या अधिकाऱ्यांना आणखी तीन वेळा संधी दिली जाईल.

२०१६ च्या बॅचमधील हे सर्व अधिकारी आहेत. बॅचमधील निवडीनंतर सर्व अधिकाऱ्यांना ४५ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात कायदेविषयक अभ्यासासोबत मैदानी चाचण्यांचा देखील समावेश असतो. नेमबाजी, तिरंदाजी, जलतरण, घोडेस्वारी यांचे प्रशिक्षण अधिकाऱ्यांना दिले जाते. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमीमधून पदवी घेताना या भावी अधिकाऱ्यांना परीक्षेत पास होणे बंधनकारक असते. चार ते पाच महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर परिक्षा घेतल्या जातात. त्यात सत्र परिक्षांचे स्वरूप वस्तुनिष्ठ तर अंतिम परिक्षांचे स्वरूप लेखी असते.

२०१६ बॅच – १३६ प्रोबेशनरी अधिकारी, पैकी १४ भूतान, नेपाळ आणि मालदिवचे आहे. तीन अधिकारी सर्व विषयात उत्तीर्ण, विधी आणि अंतर्गत सुव्यवस्था विषयात अनेक अधिकारी अनुत्तीर्ण, पदके विजेत्या अधिकाऱ्यांचा अनुत्तीर्णांच्या यादीत समावेश,
एवढ्य़ा मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण होण्याची बहुधा पहिलीच वेळ आहे.