नवी दिल्ली: जनता दल युनायटेड बिहारच्या बाहेर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणून यापुढे राहणार नाही. आज झालेल्या जेडीयूच्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय झाला आहे. आगामी विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या जम्मू- काश्मीर, हरियाणा, आणि दिल्ली मध्ये जेडीयू स्वबळावर लढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या मन्त्रिमंडळाच्या शपथ विधीत जेडीयूच्या खासदारांना मंत्रीपद घेऊ देण्यास नितीश कुमार यांनी नकार दिला होता. आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत नितीश काहीतरी मोठा निर्णय घेतील अशी अपेक्षा होती, पण नितीश यांनी बिहार बाहेर एकला चलो ची भूमिका घेत भाजपाला धक्का दिला आहे. नितीश यांनी शुक्रवारी सांगितले होते की, भाजपा बरोबरचे आमचे संबंध पुर्वीप्रमाणेच राहणार आहेत. एनडीए आघाडीतील आमचा सहभाग कायम राहिल.