चोपडा प्रतिनिधी
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
युग महावीर जैन (९४.८०%), निखिल गोपाल महाजन (९२.८०%), यज्ञेश राजेश लांडगे (८७.४०%), मानसी ज्ञानेश्वर शिंदे (८६.८०%), हेमांगी विजय पाटील (८५.४०%), यश दिपक जोशी (८५.००%), हेमंत विजय पाटील (८४.००%), तुषार उमेश चौधरी (८३.६०%), पूर्वा मनेश देसले (८२.४०%), शौर्य दिपेश काबरा (८२%) या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा आशा विजय पाटील, सेक्रेटरी डॉ. स्मिता संदीप पाटील, शाळा समन्वयक एन. एस. सोनवणे आणि डी. एस. पाटील, मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते करण्यात आला. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, दीप्ती पाटील, अमन पटेल, विशाखा बडगुजर, साक्षी बिडकर, हेमांगी पाटील, उज्वला भट, जगदीश पाटील, शकील अहमद, पूजा चौधरी,सचिन पाटील आणि दिपाली पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती एन. एस. सोनवणे, डी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून यज्ञेश लांडगे या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले तर पालक प्रतिनिधी म्हणून योगिता जैन, रूपाली काबरा, दीपक जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष अॕड. श्री. संदीप सुरेश पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमन पटेल यांनी केले तर आभार प्रदर्शन डी. एस. पाटील यांनी केले.