चिदंबरम यांना पुन्हा झटका; ईडीकडून अटक !

0

नवी दिल्ली: मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ५ सप्टेंबरपासून तिहार जेलमध्ये असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आज बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. ईडीच्या तीन सदस्यांच्या पथकाकडून चिदंबरम यांची तिहार जेलमध्ये चौकशी करण्यात आली. जवळपास एक तास चौकशी सुरु होती. चौकशीनंतर पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली. काल मंगळवारी विशेष न्यायालयाने ईडीला चिदंबरम यांची चौकशी करून अटकेची परवानगी दिली होती.

यावेळी चिदंबरम यांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम, आई नलिनसोबत पोहोचले होते. ईडीने पी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यावर न्यायालयाने त्यांना चौकशीची परवानगी दिली. तसंच चौकशीदरम्यान हाती लागलेल्या माहितीच्या आधारे अटक करण्याचा निर्णय ईडी घेऊ शकतं असंही सांगितलं आहे.