दिल्ली: हवाई उद्योगातील कराराच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याप्रकरणी दि. 23 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापुर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची देखील चौकशी करण्यात आली होती. 2008-09मध्ये हवाई उद्योगातील करारात गैरव्यवहार झाला होता. तत्कालीन उद्योग सल्लागार दीपक तलवारने तीन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर हवाईमार्ग एअर इंडियाला मिळवून देण्याऐवजी तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात त्याला 272 कोटी रुपये मिळाले होते. त्यावेळी पी. चिदंबरम देशाचे अर्थमंत्री होते. त्यामुळे ईडीने त्यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. तत्कालीन नागरी उड्डाण खात्याचे मंत्री प्रफुल्ल पटेल यांची देखील जून महिन्यात ईडीने चौकशी केली होती.