सरकारने जीएसटीचे निश्चित लक्ष का कमी केले?; चिदंबरम यांचा प्रश्न

0

नवी दिल्ली-माजी अर्थमंत्री कॉंग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी आज वस्तु व सेवा कर (जीएसटी)बाबत निश्चित ध्येयात करण्यात आलेल्या बदलावर  प्रश्न उपस्थित केले आहे. जीएसटीचे ठरविलेले लक्ष यात का बदल केले जात आहे असा प्रश्न त्यांनी केला आहे. जीएसटीचा १८ टक्क्यांचा टप्पा कमी करून तो १५ टक्के करण्याचा सरकार विचार करत आहे. काल पर्यंत जीएसटी १५ टक्क्यांच्या टप्प्यात आणावे या मागणीवर विचार केला जात नव्हता. कालपर्यंत ही मागणी धूळखात पडली होती आज अचानक सरकारने त्याचा विचार कसा केला असाही प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे.

ट्वीटकरत चिदंबरम यांनी सरकारवर निशाना साधला आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीचा २८ टक्क्यांचा टप्पा हळूहळू कमी होत असून तो पूर्णत रद्द केला जाईल असे सांगितले आहे. याअगोदर असे का केले नाही असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो आहे.