चिदंबरम पिता-पुत्राला दिलासा; ‘या’ प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

0

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना दिल्लीतील विशेष कोर्टाने आज गुरुवारी ५ रोजी एअरसेल-मॅक्सीस प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला. ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास संस्थांच्या खटल्यांमधून जामीन मंजूर करण्यात आल्याने दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पी. चिदंबरम सध्या आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयच्या कोठडीत आहेत.

आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित गैरव्यवहारप्रकरणी चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, तो अर्ज सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला. त्यामुळे ईडी आता चिदंबरम यांना चौकशीसाठी अटक करू शकते. चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत आज गुरुवारी ५ रोजी संपत आहे.