इंडोनेशियन ओपन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूचा पराभव

0

जकार्ता: भारताच्या पी.व्ही. सिंधूचे इंडोनेशियन ओपन ग्रां.प्रि. स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न रविवारी भंगले. जपानच्या अकाने यामागुचीकडून 15-21, 16-21 असा पराभव केला. या लढतीत यामागुची हिने सुरुवातीपासूनच जोरदार खेळ करत सिंधूवर दबाव राखला. त्यात पहिल्या गेममध्ये 21-15 अशी बाजी मारल्यानंतर यामागुचीने मागे वळून पाहिले नाही. अखेरीस दुसऱ्या गेममध्येही 21-16 असा विजय मिळवत तिने सामना सगळ गेममध्ये जिंकसा.

तत्पूर्वी ऑलिम्पिकची रौप्य विजेती भारतीय स्टार पी. व्ही. सिंधू हिने शनिवारी ऑल इंग्लंड चॅम्पियन चेन युफेई हिच्यावर सरळ गेममध्ये मात करीत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या चेनवर सिंंधूने २१-१९, २१-१० अशा फरकाने विजय नोंदविला. ऑस्ट्रेलियन, स्विस आणि ऑल इंग्लंड ओपन जिंकणारी चेन यंदाच्या मोसमात दमदार खेळ करीत होती. सिंधूने मात्र तिला संधीच दिली नव्हती.