पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा अंतिम निकाल जाहीर!
शिवसेना ९, महाविकास आघाडी ७ तर भाजची २ संचालकांची निवड!
पाचोरा ( प्रतिनिधी )३० रोजी पाचोरा येथील शहरातील रामदेव लॉन्स येथे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकाल ठेवण्यात आला होता. या निवडणुकीत पाचोरा शहरासह तालुक्याचे लक्ष लागून प्रतिष्ठेची ठरलेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मतदार राजांनी अनेकांना घाम फोडलेला आहे. यामध्ये मतदारसंघात आमदार किशोर पाटील पुरस्कृत शिंदे गटाला एकूण ९ जागा तर महाविकास आघाडीच्या ७ तर भाजप पुरस्कृत अमोल शिंदे यांना २ जागा मिळाली गणेश भिमराव पाटील (६०६) मते कपबशी
सतीश परशुराम शिंदे (६०४) मते शिट्टी प्रशांत दत्तात्रय पवार (५९७ )मते छत्री प्रकाश अमृत पाटील (५६९) मते
कपबशी शामकांत अशोक भोसले( ५२४ )मते छत्री मनोज उत्तमराव महाजन (४८७) मते छत्री विजय कडू पाटील (४७६) मते
छत्री महिला राखीव मध्ये पुनम प्रशांत पाटील( ६९७) कपबशी
सिंधुताई पंडितराव शिंदे (५६८ )शिट्टी ,उद्धव दत्तू मराठे (५७९) छत्री
लकीचंद प्रकाश पाटील (५४१) कपबशी ग्रामपंचायत सर्वसाधारण मध्ये नीलकंठ नरहर पाटील (४५९) ,सुनील युवराज पाटील (४३६),ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मधुन राहुल रामराव पाटील( ४४९) ,हमाल मापारी मतदार संघात पटेल युसूफ भिकन (१०९ )छत्री ,व्यापारी मतदारसंघात मनोज प्रेमचंद सिसोदिया (१३४ )कपबशी राहुल अशोक संघवी( १०२) छत्री.
एस सी मतदारसंघातून प्रकाश शिवराम तांबे( ४५०) कपबशी हे विजयी उमेदवार आहेत .
यामध्ये एकूण १८ जागांचा निकाल लागला असून यात महाविकास आघाडीच्या छत्रीला सात जागा तर विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या कपबशीला नऊ जागा व भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या शिट्टी निशाणीला दोन जागा मिळाल्या आहेत.