तहसीलदारांना निवेदन सादर
पाचोरा – भ्रष्टाचार, पेट्रोल डीझेलची दर वाढ, राज्यातील विविध अपघातात दोषींवर कारवाई करावी, शेतकर्यांना पिक कर्ज तात्काळ द्यावे अशा विविध मागण्या संदर्भात भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस कडुन निदर्शने करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
राज्यात गेल्या पाच वर्षांपासून शिवसेना – भाजपा युती सरकारच्या काळात सतत भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात आहे. विरोधी पक्षनेते, प्रसार माध्यमे आणि आरटीआय कार्यकर्ते यांनी सतत भ्रष्टाचाराच्या संबंधित ठोस पुरावे देऊन कारवाई नाही. मुंबई येथे भिंत कोसळून २७ जणांचे बळी गेले हीच भिंत मागिल दिड वर्षा पुर्वी २१ कोटी रुपये खर्च करून बांधले गेले होते पंरतु कारवाई नाही,धरणे फुटली बळी गेले कारवाई नाही, शेतकर्यांना पिक कर्ज दिले जात नाही, पिक कर्ज तातडीने द्यावे यासाठी सरकारने बँकेनां आदेश द्यावेत, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाली या विषयावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यासंदर्भात तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदने देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी अ. भा. राहुल गांधी युथ ब्रिगेड चे महाराष्ट्र प्रभारी सचिन सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, माजी सभापती इस्माईल शेख फकीरा,जिल्हा सरचिटणीस नंदकुमार सोनार,प्रा. एस. डी. पाटील, शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण,विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, मुक्तार शहा, महीला जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, तालुका अध्यक्ष कुसुम पाटील, डॉ. धनराज पाटील, शे. इरफान शे. मनियार, जावेद मुल्ला, अॅड. मनिषा पवार,मुशर्रफ खान, सैय्यद लाल सैय्यद गयास, सैय्यद साबिर, शे. शकील शे. इब्राहिम, शे. अबीद शे. अजीज, निर्मला महाजन, कमळाबाई पाटील, युवराज कुर्हाडकर, गणेश पाटील आदी उपस्थित होते.