केवळ समाजहित हेच ध्येय बाळगा – सुरेश पांडे

0

भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा आणि रॅली उत्साहात

पाचोरा(प्रतिनिधी)- आपसातील मतभेद विसरून केवळ समाजहित हेच ब्रीद ब्राह्मण समाजाने बाळगावे. कारण संस्कार आणि ज्ञान याचे वरदान ब्राह्मण समाजाला लाभले असल्याने समाज प्रगती केल्याशिवाय राहणार नाही असे मत भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना सुरेश पांडे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने भगवान परशुराम जयंती जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेकडो ब्रह्मवृंदांनी येथील कैलामाता मंदिरापासून भडगाव रोड, शिवाजी चौक, देशमुख वाडी, आठवडे बाजार,गांधी चौक,जामनेर रोड अशी भव्य बाईक रॅलीत सहभाग नोंदविला.यावेळी शोभायात्रेत भगवान परशुराम यांचा सजीव देखावा देखील साकारण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मुकुंद बिल्दीकर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या शोभायात्रेची सांगता जैन पाठशाळा येथे झाल्यानंतर भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी गोविंदराव मोकाशी यांनी स्वागत गीत व ईशस्तवन तर उदय जोशी यांनी सामूहिक शांतीपाठ सादर केले. मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक किशोर पुराणिक यांनी केले तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे तालुकाध्यक्ष मुकुंद बिल्दीकर यांनी मनोगत व्यक्त केले. समाजासाठी जागा खरेदी केली गेली असल्याचे त्यांनी जाहीर केले. सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले तर आभार भरत खंडेलवाल यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला दुष्यंत रावल, जगदीश शर्मा, अरविंद खंडेलवाल, अशिष शर्मा, उदय जोशी, सागर तांबोळी, सुनील गौड, संजय कुलकर्णी,ऍड सचिन देशपांडे, श्यामभाऊ शर्मा, प्रभुराम शर्मा, गिरीश कुलकर्णी, महावीर गौड,भरत खंडेलवाल, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुधा शर्मा, स्मिता सराफ,स्वाती कुलकर्णी, हेमा पाटील, मयुरी बिल्दिकर, स्वाती जोशी आदी मान्यवर उपस्थित होते .पूजा तांबोळी, सीमा कौंडिण्य, रूपाली पुराणिक, पूजा तळेगावकर, क्षमा शर्मा यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी भगवान परशुराम यांची शैलेश कुलकर्णी आणि शर्वरी तांबोळी यांचा देखील सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी श्याम शर्मा, अरविंद खंडेलवाल, सागर तांबोळी, उदय जोशी, सुनील गरुड, प्रशांत कुलकर्णी, संजय अवचित कुळकर्णी यांनी परीश्रम घेतले.