भोजपुरी गायक पद्मश्री हिरालाल यादव यांचे निधन !

0

नवी दिल्ली: प्रसिद्ध भोजपुरी गायक पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हिरालाल यादव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते यावर्षी प्रजासत्ताक दिनी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पूर्वांचलपासून बिहार पर्यंत त्यांची गायकी प्रसिद्ध होती. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. भोजुबीर येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयातून चौकाघाट येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना आणण्यात आले, तेथे त्यांनी शेवटचे श्वास घेतले.