पाकच्या घुसखोर विमानांना भारताने पिटाळले

0

थोड्या वेळेपूर्वी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानांनी घुसखोरी केली असून भारतीय हवाई दलाने या विमानांना पिटाळून लावले आहे.

या विमानांनी भारतीय हद्दीत बॉम्बहल्ला केला. भारतीय सैन्याच्या चौकीजवळ त्यांनी बॉम्ब फेकले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पाकने घुसखोरी केल्याच्या घटनेनंतर श्रीनगर, लेह आणि पठाणकोट विमानतळांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या विमानतळांवरील सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.