पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती झरदारी यांना अटक !

0

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. झरदारी यांच्यावर खोटी बँक खाती उघडल्याचा आरोपावरुन एनएबीने त्यांना अटक केली आहे. आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पती असून, 2008 ते 2013 या काळात त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपतीपद भूषवले होते.