मुंबई- पाकिस्तानातील तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख माजी क्रिकेटपटू इम्रान खान १८ ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी माजी क्रिकेटपटू कपिल देव, नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील गावसकर यांनी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र या शपथविधीला जाणार नसल्याचे सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे. कसोटी मालिकेच्या समालोचनात व्यस्त असल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे. असे असले तरी पाकिस्तानला गेल्यास देशभरातून टीका होईल ही धास्ती असल्याने क्रिकेटपटूंनी पाकिस्तानात जाणे टाळले असल्याचे बोलले जात आहे.