नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवत पुन्हा सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फोनवरून अभिनंदन केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी आज रविवारी ट्विट करून ही माहिती दिली. यावेळी दोन्ही शांततेसाठी आणि जनतेच्या भल्यासाठी मिळून काम करतील, अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली. त्यावर मोदींनी ‘दोन्ही देशांत शांतता आणि समृद्धीसाठी हिंसामुक्त, दहशतवादमुक्त वातावरणाची खूप आवश्यकता आहे,’ असे उत्तर मोदींनी दिले. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या बालाकोट एअरस्ट्राइकनंतर दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदाच फोनवर चर्चा केली.
हे देखील वाचा