पाकिस्तानकडून ‘गझनवी’ क्षेपणास्त्र चाचणी !

0

लाहोर: पाकिस्तानने आज गुरुवारी २९ रोजी सकाळी ‘गझनवी’ क्षेपणास्त्राची चाचणी केली. २९० किलोमीटरपर्यंत या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हे क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. गझनवी क्षेपणास्त्राच्या चाचणीमागे भारतावर दबाव टाकण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्याच्या पाकिस्तानचा हेतू असू शकतो.

या क्षेपणास्त्र चाचणीसाठी पाकिस्तानने कराची शहरातील हवाई क्षेत्राचा काही भाग ३१ ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने या चाचणीआधी नोटॅम जारी केला होता. पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. नोटॅमच्या नोटीसमध्ये आंतरराष्ट्रीय विमानांना कराची हवाई हद्दीतील तीन मार्गांवरुन विमान वाहतूक टाळण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यायी मार्गही सुचवण्यात आले आहेत.