इस्लामाबाद: रमजान महिना चालू असल्यामुळे पाकिस्तानातील भारतीय दुतावासात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यानी रोखत याचे वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली असल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात होते. या प्रकरणी पाकिस्तान मधील भारतीय दूतावास यांनी सर्व पाहुण्यांची माफी मागितली आहे.
भारतीय दुतावासाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या शेकडो लोकांना गुप्त क्रमांकांवरून फोन करत त्यांना धमकवण्यात आले होते. या प्रकरणी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी पाकिस्तान विरोधात नाराजी व्यक्त करत राजनैतिक शिष्टाचाराचे पाकिस्तानने उल्लंघन केले आहे. या प्रकारामुळे उभय देशांमधील संबंधांवर परिणाम होतील,' असे उच्चायुक्त बिसारिया म्हणाले.