नॉटिंगहॅम : गुरुवारपासून क्रिकेटच्या महाकुंभाला अर्थात विश्वचषक २०१९ ला सुरुवात झाले आहे. पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात झाला. इंग्लंडने आफ्रिकेला नमवत विजयाचा श्रीगणेशा केला. दरम्यान शुक्रवारी ३१ रोजी दुसरा सामना पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघात होत आहे. दोन्ही संघ म्हणजे अनपेक्षित कामगिरीसाठी ओळखले जातात. कोणत्याही क्षणी मातब्बर संघांना पराभवाचा धक्का देण्याची क्षमता बाळगून असलेले हे दोन्ही संघ विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला आहे तर वेस्ट इंडीज संघ जेसन होल्डरच्या नेतृत्त्वात खेळत आहे.
सामन्याला सुरुवात झाले असून पाकिस्तानला पहिला धक्का बसला आहे. पाकने पहिल्याच षटकात पहिला गडी गमवला. इम्रान केवळ दोन धावांवर बाद झाला.