धक्कादायक: केबीसीचा पाकिस्तानकडून गैरवापर

0

नवी दिल्ली: भारतीय टीव्हीशोमधील लोकप्रिय शो म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’कडे बघितले जाते. बॉलीवूडचे बादशहा अमिताभ बच्चन या शोला होस्ट करतात. दरम्यान या शोचा पाकिस्तानकडून गैरवापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय नागरिकांना फसविण्यासाठी पाकिस्तानातून बनावट सोशल मीडिया अकाऊंट हाताळण्यात येत असल्याचे भारतीय संरक्षण विभागाने जाहीर केले आहे.

‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाने बनावट व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनविण्यात आले असून त्यात सामील होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. याबाबत संरक्षण मंत्रालयाच्या सायबर सेलने चौकशी केली असता, त्यात ही बाब समोर आली आहे.