काश्मीर सीमेवर पाकीस्तानची चौकी उध्दवस्त

0

श्रीनगर : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतल्याने पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. भारताकडूनही त्यास चोख प्रत्युत्तर दिले जात असून भारतीय लष्कराने आज राजौरी सेक्टरजवळ सीमेपलीकडील पाकिस्तानची सुरक्षा चौकी उध्दवस्त केली.
जम्मू-काश्मीरबाबत भारताने ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. काश्मीरमध्ये कलह निर्माण करण्यासाठी वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे काश्मीरमधील सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.