कॉंग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावितांना उमेदवारी कशी दिली? -खडसे 

0
मुंबई :- भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूमुळे पालघरमध्ये रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली जात असल्याने हे साफ चुकीचे असल्याचे सांगत एकनाथराव खडसे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
खडसे म्हणाले की, श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन चूक केली, असे भाजप म्हणते. मग तुम्ही राजेंद्र गावितांना उमेदवारी कशी दिली? असा सवालही खडसेंनी उपस्थित केला आहे. पालघरच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपने दिलेला प्रस्ताव फेटाळला असून या निवडणुकीतून माघार न घेण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी किंवा विधानपरिषदेची आमदारकी दिली जाईल, असा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला होता. परंतु शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळला आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. भाजपकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत. भाजप आणि शिवसेनेने परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने पालघरमध्ये आता चौरंगी लढत होणार आहे.