पनामा पेपर प्रकरणी ‘या’ भारतीयांवर गुन्हा दाखल

0

नवी दिल्ली : पनामा पेपर्स लीक प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर 2 वर्षांनी पनामाच्या लॉ फर्म मोसैक फोनसेकाच्या माध्यमातून कंपनी बनवणाऱ्या भारतीयांची 1,140 कोटी रुपयांची अघोषित संपत्तीची माहिती मिळाली आहे. मोसैक फोनसेका आता बंद झाली आहे. या प्रकरणात 16 भारतीय वेगवेगळ्या शहरांमध्ये न्यायालयीन कारवाईचा सामना करत आहे. मोसैक फोनसेकाचा कागदपत्र लीक झाल्यानंतरच पनामा पेपर्स प्रकरण समोर आले होते.

आता या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर चौकशीच्या स्थितीची माहिती समोर आली आहे. विदेशी संस्थांनी भारतीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर गुन्हे नोंदवण्यात आले. पनामा पेपर लीक प्रकरणात पहिली याचिका 9 डिसेंबर 2016 ला कोलकाताच्या न्यायालयात दाखल करण्यात आला. याशिवाय अहमदाबाद, बंगळुरु आणि मुंबईमध्ये देखील गुन्हे नोंदवण्यात आले.

या प्रकरणात 2 वर्षाची शिक्षा होऊ शकते. पनामा पेपर्स लीक प्रकरणात ज्या भारतीयांवर कारवाई सुरु आहे त्यांच्यामध्ये बलराम लोढा, भारमल लोढा, राजेंद्र पाटील, अनुराग केजरीवाल आणि धवल पटेल यांचा समावेश आहे.