पंचवटी, आडगाव शिवारात दोन फिरस्त्यांचा बुडून मृत्यू

 

नाशिक l

चरातील गोदावरी नदीपात्रात श रामकुंडाजवळील गांधी तलावात एका फिरस्त्याचा मृतदेह आढळून आला आहे. तसेच सावित्रीबाई फुलेनगर, दुर्गानगर भागातील पाटातही एका फिरस्त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने पंचवटी, आडगाव परिसरात या उलटसुलट सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकुंडाजवळील गांधी तलावात बुडून परप्रांतीय फिसल्याचा मृत्यू झाला. राजाराम नेपाल निसाळ (३५, मूळ रा. भागलपूर राज्य बिहार, सध्या रा. फिरस्ता पंचवटी) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी, ९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गांधी तलावाच्या कडेला रामकुंड येथे निसाळ यांच्या मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. महिला पोलीस शिपाई रोहिणी भाइर व गवळी या रामकुंड, गंगाघाट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गांधी तलावाजवळील गोल घुमट येथे लोकांची गर्दी दिसल्याने त्यांनी माहिती घेतली. यावेळी निसाळ यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.

ठोंबरे यांच्या घरासमोरील पाटात बुडून फिरस्त्याचा मृत्यू

आडगाव शिवारातील अमृतधाम परिसरातील सावित्रीबाई फुलेनगर, दुर्गानगर येथील ठोंबरे यांच्या घरासमोरील पाटात एका फिरस्त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याची अद्याप ओळख पटलली नाही. मात्र, पोलिसांनी मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसली तरी त्याचे वय ५० ते ५५ वर्षापर्यंत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपास पोलीस हवालदार द्वापसे करत आहेत.