नेहरू गोमांस खायचे ते ‘पंडित’ होऊ शकत नाही; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

0

नवी दिल्ली-जवाहरलाल नेहरू गोमांस खायचे ते कधीच पंडित असू शकत नाही, असे वादग्रस्त विधान राज्यस्थानचे भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी केले आहे. भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी काँग्रेसवर टीका करतांना असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

राहुल गांधी कधी इंदिरा गांधींसोबत मंदिरात गेले होते का?, काँग्रेस नेत्यांनी हे सिद्ध करावे, मी पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, असे आव्हानही त्यांनी दिले. सचिन पायलट यांच्या विधानाचाही अहुजा यांनी समाचार घेत टीका केली.