नवी दिल्ली-क्रिती सेनॉन ही आशुतोष गोवारीकर निर्मित पानीपत या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मराठा नेते सदाशिवराव भाऊ यांची भूमिका अभिनेता अर्जुन कपूर सकारात आहे. त्यांच्यासोबत क्रिती सेनॉन परागीबाईची भूमिका साकारत आहे. तर संजय दत्त या चित्रपटात अहिंद शाह दुर्रानीच्या भूमिकेत दिसणार आहेत. क्रिती सेनॉन तिच्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी सखोल प्रशिक्षण घेत आहे.
मराठा योद्धाची पत्नी म्हणून क्रितीकडून विशिष्ट कौशल्ये जाणून घेणे अपेक्षित आहे. ती घोडेस्वारी शिकत आहे. जरी चित्रपट हिंदी असला तरी ती मराठीही शिकावी लागत आहे. हा चित्रपट पानिपतच्या तिसर्या लढाईवर आधारित आहे. जो 1761 मध्ये झाला होता. हा युद्ध इतिहासातील सर्वात महाकाय युद्धांपैकी एक आहे.